मिनी सियाम
ही संक्लपना तर अतिशय चांगली आहे. थायलंड मधिल ७६ ऎतिहासिक वास्तू लहान स्वरूपात येथे बनवून ठेवल्या आहेत. शिवाय जगातील अनेक ऎतिहासिक वास्तू लहान स्वरूपात आहेत. सर्वात महत्वाची सूचना म्हणजे, जर इथल्या गोष्टी जर आपण खराब केल्यात तर त्याचा संपूर्ण खर्च तुमच्याकडून वसुल करतात.
त्यामुळे सर्व वास्तू चांगल्या स्वरूपात आहेत. सर्वसाधाहरण पणे इथे २ तास तरी द्यावे लागतात. जगातील सात आश्चर्यांपैकी काही आहेत, पण ताजमहाल काही त्यांना बनवायला जमला नाही असे दिसते.
थायलंड मधे अयुधया (म्हणजे अयोध्या) नावाची त्यांची पूर्वीची राजधानी आहे आणि श्रीराम हाच इथला राजा आहे असा समज आहे. त्यामुळे रामायण ही आहे.
सध्या इथले राजे राम ९ यांचे राज्य चालू आहे. गेले ६० वर्ष ते राज्य करत आहेत. नुकताच ह्याचा समारंभ थायलंड मधे साजरा केला गेला.
राम असल्यामुळे रावणही आहे. मिनी सियाम मधे समोरच रावणाचा पुतळा आहे आणि शेषावरचा विष्णूही आहे.
एकंदरीत मिनी सयाम चांगले आहे.

1 Comments:
I really liked ur post, thanks for sharing. Keep writing. I discovered a good site for bloggers check out this www.blogadda.com, you can submit your blog there, you can get more auidence.
Post a Comment
<< Home