पर्यटनाला सुरवात

संध्याकाळी "अलकझार" हा शो बघून आम्ही आमच्या पर्यटनाला सुरवात करणार होतो. शो १ तासाचा असतो आणि कॅब्रे असला तरी आपण तो कुटुंबाबरोबर बघु शकतो. शो ८ वाजता चालू झाला. पटायाला गेल्यावर हा शो अजिबात चुकवू नये. नाचाचे वेगवेगळे प्रकार ह्यामध्ये आहेत.
हा शो सुमारे २० वर्षांपूर्वी चालू झाला. भव्य नाट्यगृह, १२०० लोकांची बैठक व्यवस्था, ४४० कलाकार, चांगल्या आवाजासाठी डीटीस प्रणाली यांनी हा शो अगदी मनाला भारून टाकतो.
एकाच कलाकाराने केलेला व्दिरूप नाच (म्हणजे एका बाजूला बाईचे रूप व दुसर्या बाजूला पुरूषाचे रूप). तसेच अजून एक व्दिरूप नाच म्हणजे एका म्हातार्याने एका मुलीला पाठिवर घेऊन केलेला नाच. हे दोन्ही नाच अतिशय चांगले झाले.

जपानी नाच, म्हणजे अगदी आपल्या भारतीय सिनेमात असतो तसा..:) आणि शेवटी केलेला फुलपाखराचा नाच तर फ़ारच अप्रतिम झाला.
ह्या कार्यक्रमानंतर मग आम्ही करी पॉट ह्या देशी हॉटेल मधे जेवायला गेलो. ३०/०६/२००६.

0 Comments:
Post a Comment
<< Home