प्रवाळाची बेटे

०१/०६/२००६
हा दिवस तसा फ़ारच गडबडीचा जाणार हे स्पष्टच होते. एकाच दिवसात ३ ठिकाणी जाणे हे जरा फ़ारच होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून तयार होणे इष्ट होते. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ८:३० ला निघालो. एक वेगाने जाणारी बोट आमच्यासाठी तयार होती.
पटायापासून जवळच अनेक छोटी प्रवाळाची बेटे आहेत. तिथे अनेक पाण्यामधिल खेळ प्रसिद्ध आहेत आणि स्वस्तही आहेत. त्यामुळे सर्व खेळांचा आस्वाद घ्यायचा हे मी मनाशी ठरवले होते.
त्याप्रमाणे Parasailing, Banana Boat Ride, Water Scooter, Under Water Walk हे सर्व मी केले. पाण्यामधील विश्व हे फारच अद्भुत आहे. अचानक लाखो मासे आपल्याभोवती बघून एकदम मस्त वाटते. प्रवाळ, स्टार फिश ह्याना जवळून हाताळता आले. ३०-४० मिनिटे कशी गेली कळले सुद्धा नाही. Parasailing करताना मात्र जरा सावध असलेले बरे. अचानक बोट तुम्हाला ओढून घेते त्यावेळी पळताना फ़ार तारांबळ उडते. मात्र हे एकदा जमले की मात्र पुढचा प्रवास फ़ार चांगला होतो. आकाशात पंख लावून फिरताना छान वाटते. उतरताना मात्र ते लोक छान उतरवून घेतात. आईने व मुग्धाने Parasailing केले. मजा आली. नंतर जरा समुद्रात मी आणि श्रीपाद डुंबलो. आईने व मुग्धाने मात्र विश्रांती घेणेच पसंत केले.समुद्राच्या पाण्याच्या आत जाऊन तेथिल जीवन बघणे हा एक जबरदस्त अनुभव होता माझ्या साठी. प्रवाळ, अनेक मासे आपल्या भोवती फिरताना मन हरखून गेले.

दुपारी आम्हाला नूग नूच गावाला जायचे होते, त्यामुळे समुद्र सफर सोडून हॉटेल वर आलो आणि जेवलो.

1 Comments:
वा! सुंदर छायाचित्रे आणि वर्णन! लेख आवडला.
Post a Comment
<< Home