सुरवात

तसे आम्ही जवळ जवळ १-२ वर्ष ठरवत होतो की सिंगपोर ट्रिप करायची, पण बर्याच कारणानी ते लांबत गेले. ह्यावर्षी पण तसे नक्कि नव्हते. शेवटी मात्र ठरवले की जायचेच. अनेक अडचणींचे डोंगर पार करून अखेर २९ मे ही तारिख़ ठरली आणि तयारीला सुरवात केली. आईचा आणि श्रीपादचा हा पहिलाच आंतराष्ट्रिय प्रवास होता.
भाग्यश्री ट्रवेल्स ने आमची ट्रिप आयोजित केली होती आणि आमच्या बरोबर पहिले ६ दिवस सौं अनिता गोळे ह्या येणार होत्या. २९ मे ला साधाहरण ३ च्या सुमारास सन्डिस ट्रवेल्स च्या गाडिने निघालो. संध्याकाली ७ च्या सुमारास पोचलो. पण चेक इन काउन्टरला आह्माला काही कुल - बँकॉकचा बोर्डिन्ग पास मिळला नाही. मग अनेक फोनफोनी नंतर तिथे गेल्यावर मिळेल असे ठरले.
मलेशिअन ऐरलाईन्स ने रात्री १०:२० ला मुंबई सोडले आणि आम्ही समोरच्या पडद्यावर असणारे मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यात रंगून गेलो. वेलकम ड्रिन्क, जेवण, चहा, कॉफी झाल्यानंतर जरा झोप काढली आणि तो पर्यन्त विमान कुलला पोहचणार ह्याची चाहुल लागली. स्थानिक वेळेनुसार आम्ही सकाळी ५:३० ला कुल विमानतळावर उतरलो आणि पुढचा बँकॉक साठीचा बोर्डिन्ग पास घेतला.
दोन विमानांन मध्ये सुमारे ४ तास असल्यामुळे निवांत झोप काढली. कुल विमानतळावरचे वातानकुलीत यंत्र हे सुमारे ४ डिग्री C ला सेट केले असल्यामुळे ..:) जरा पंचाईत झाली.
१० वाजता दुसरे विमान होते पण, कागदपत्रे वेळेवर न मिळाल्यामुळे ३० मिनिटे उशिरा निघाले आणि सुमारे २ तासांनी बँकॉकला पोचले.

0 Comments:
Post a Comment
<< Home