Thursday, June 22, 2006

मिनी सियाम

ही संक्लपना तर अतिशय चांगली आहे. थायलंड मधिल ७६ ऎतिहासिक वास्तू लहान स्वरूपात येथे बनवून ठेवल्या आहेत. शिवाय जगातील अनेक ऎतिहासिक वास्तू लहान स्वरूपात आहेत.

सर्वात महत्वाची सूचना म्हणजे, जर इथल्या गोष्टी जर आपण खराब केल्यात तर त्याचा संपूर्ण खर्च तुमच्याकडून वसुल करतात.

त्यामुळे सर्व वास्तू चांगल्या स्वरूपात आहेत. सर्वसाधाहरण पणे इथे २ तास तरी द्यावे लागतात. जगातील सात आश्चर्यांपैकी काही आहेत, पण ताजमहाल काही त्यांना बनवायला जमला नाही असे दिसते.

थायलंड मधे अयुधया (म्हणजे अयोध्या) नावाची त्यांची पूर्वीची राजधानी आहे आणि श्रीराम हाच इथला राजा आहे असा समज आहे. त्यामुळे रामायण ही आहे.

सध्या इथले राजे राम ९ यांचे राज्य चालू आहे. गेले ६० वर्ष ते राज्य करत आहेत. नुकताच ह्याचा समारंभ थायलंड मधे साजरा केला गेला.

राम असल्यामुळे रावणही आहे. मिनी सियाम मधे समोरच रावणाचा पुतळा आहे आणि शेषावरचा विष्णूही आहे.

एकंदरीत मिनी सयाम चांगले आहे.



Wednesday, June 21, 2006

नूग नूच गाव ०१/०६/२००६

तसे हे काही वेगळे गाव नाही, आहे पटायामध्येच. पण ही जागा वेगळी अशी ठरवून त्यामध्ये थाई संस्कृतीचे दर्शन घडवतात. हि संक्लपना तशी भारतात पण आहे, पण अतिशय सुंदरपणे नूग नूच गाव येथे राबवलेली आहे.

एक गोष्ट मात्र आहे की सर्व ठिकाणी पैसे अगदी वाजवून घेतात, आणि त्याचा मोबदलाही अगदी पुरेपुर मिळतो. उदाहरण द्यायचे झाले तर, वाघाबरोबर फोटो काढण्याचे सुमारे ५० रूपये. ह्त्तीला केळी द्यायची असतील तर २५ रूपये. असे आहे.

ह्या गावामधे ३ गोष्टी आहेत त्या अशा. १) थाई संस्कृतीचे दर्शन २) हत्तींचे खेळ ३) विषवृत्तीय जंगलामधिल वनस्पती. हे सर्व बघताना वेळ कमी पडतो. वेळेचे नियोजन हा महत्वाचा मुद्दा आहे.

१) थाई संस्कृतीचे दर्शन : ह्या मधे थाई नाच, खरं तर समुह नृत्य. अनेक कलाकार एकत्र येतात. विषेश म्हणजे ह्या नाचात नाचणार्‍या बायका डोक्यावर बरेव काही चढवतात ते बघण्यासारखे असते. रामराज्याची कथा. नंतरच्या काळातील लढाया दाखवल्या. अगदी ब. मो. पुरंदरेंच्या "राजा शिवछत्रपतीं" सारख्या होत्या. एक तोफ आणली होती. खर्‍या तलवारींचा खणखणाट ऎकला. अगदी ठिणग्या पण उडाल्या. हत्तीवरील लढाई पण दाखवली.

कीक

Tuesday, June 20, 2006

प्रवाळाची बेटे


०१/०६/२००६
हा दिवस तसा फ़ारच गडबडीचा जाणार हे स्पष्टच होते. एकाच दिवसात ३ ठिकाणी जाणे हे जरा फ़ारच होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून तयार होणे इष्ट होते. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ८:३० ला निघालो. एक वेगाने जाणारी बोट आमच्यासाठी तयार होती.

पटायापासून जवळच अनेक छोटी प्रवाळाची बेटे आहेत. तिथे अनेक पाण्यामधिल खेळ प्रसिद्ध आहेत आणि स्वस्तही आहेत. त्यामुळे सर्व खेळांचा आस्वाद घ्यायचा हे मी मनाशी ठरवले होते.

त्याप्रमाणे Parasailing, Banana Boat Ride, Water Scooter, Under Water Walk हे सर्व मी केले. पाण्यामधील विश्व हे फारच अद्भुत आहे. अचानक लाखो मासे आपल्याभोवती बघून एकदम मस्त वाटते. प्रवाळ, स्टार फिश ह्याना जवळून हाताळता आले. ३०-४० मिनिटे कशी गेली कळले सुद्धा नाही. Parasailing करताना मात्र जरा सावध असलेले बरे. अचानक बोट तुम्हाला ओढून घेते त्यावेळी पळताना फ़ार तारांबळ उडते. मात्र हे एकदा जमले की मात्र पुढचा प्रवास फ़ार चांगला होतो. आकाशात पंख लावून फिरताना छान वाटते. उतरताना मात्र ते लोक छान उतरवून घेतात. आईने व मुग्धाने Parasailing केले. मजा आली. नंतर जरा समुद्रात मी आणि श्रीपाद डुंबलो. आईने व मुग्धाने मात्र विश्रांती घेणेच पसंत केले.

समुद्राच्या पाण्याच्या आत जाऊन तेथिल जीवन बघणे हा एक जबरदस्त अनुभव होता माझ्या साठी. प्रवाळ, अनेक मासे आपल्या भोवती फिरताना मन हरखून गेले.



दुपारी आम्हाला नूग नूच गावाला जायचे होते, त्यामुळे समुद्र सफर सोडून हॉटेल वर आलो आणि जेवलो.

पर्यटनाला सुरवात


संध्याकाळी "अलकझार" हा शो बघून आम्ही आमच्या पर्यटनाला सुरवात करणार होतो. शो १ तासाचा असतो आणि कॅब्रे असला तरी आपण तो कुटुंबाबरोबर बघु शकतो. शो ८ वाजता चालू झाला. पटायाला गेल्यावर हा शो अजिबात चुकवू नये. नाचाचे वेगवेगळे प्रकार ह्यामध्ये आहेत.

हा शो सुमारे २० वर्षांपूर्वी चालू झाला. भव्य नाट्यगृह, १२०० लोकांची बैठक व्यवस्था, ४४० कलाकार, चांगल्या आवाजासाठी डीटीस प्रणाली यांनी हा शो अगदी मनाला भारून टाकतो.

एकाच कलाकाराने केलेला व्दिरूप नाच (म्हणजे एका बाजूला बाईचे रूप व दुसर्‍या बाजूला पुरूषाचे रूप). तसेच अजून एक व्दिरूप नाच म्हणजे एका म्हातार्‍याने एका मुलीला पाठिवर घेऊन केलेला नाच. हे दोन्ही नाच अतिशय चांगले झाले.




जपानी नाच, म्हणजे अगदी आपल्या भारतीय सिनेमात असतो तसा..:) आणि शेवटी केलेला फुलपाखराचा नाच तर फ़ारच अप्रतिम झाला.

ह्या कार्यक्रमानंतर मग आम्ही करी पॉट ह्या देशी हॉटेल मधे जेवायला गेलो. ३०/०६/२००६.

Monday, June 19, 2006

थायलंडला पोचल्यावर


बँकॉकचा विमानतळ कुलच्या पेक्षा फ़ारसा चांगला नव्हता. सरकते रस्ते कमी होते आणि स्वच्छताही जरा कमीच होती. सिंगापोरचा व्हीसा असेल तर थायलंडचा व्हीसा ऑन अरायव्हल मिळू शकतो. तिथल्या अधिकार्‍याने व्हीसा आणि इमिग्रेशन एकदम केल्यामुळे जरा लवकर बाहेर पडता आले.

श्री. गुंदेचा ह्यांची एक पेटी तुटल्यामुळे वाचलेला वेळ वाया गेला. ३० मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर आम्ही गाडीमधे बसलो.

पहिल्या दर्शनात मला बँकॉक हे सुधारीत मुंबईप्रमाणे वाटले. झोपडपट्ट्या, गटारे हे सर्व आहे पण ह्याला चांगली शिस्त आहे. मुख्यत: स्वच्छता आणि वाहतुकीची शिस्त हे सर्वात पहिल्यांदा जाणवते.

८०% बौद्ध असल्यामुळे सगळीकडे मंदिरांची संख्या जास्त आहे. त्यातील हे एक अर्धनारीनटेश्वराचे मंदिर.

दुपारचे ३ वाजले असल्यामुळे खूप भूक लागली होती. रेड चिली ह्या हॉटेल मधे आम्ही भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला आणि मग पटायाच्या रस्त्याला लागलो.

ते पटाया हे अंतर सुमारे १६५ कि.मी. आहे आणि २ ते २:३० तासांमध्ये हे अंतर पार करता येते. हा पटाया पर्यन्तचा प्रवास अंदाजे २४ तासांचा झाला.

संध्याकाळी ६ वाजता आम्ही हॉटेल पटाया सेंटर मधे पोचलो. (मंगळवार ३० मे २००६).

सुरवात


तसे आम्ही जवळ जवळ १-२ वर्ष ठरवत होतो की सिंगपोर ट्रिप करायची, पण बर्‍याच कारणानी ते लांबत गेले. ह्यावर्षी पण तसे नक्कि नव्हते. शेवटी मात्र ठरवले की जायचेच. अनेक अडचणींचे डोंगर पार करून अखेर २९ मे ही तारिख़ ठरली आणि तयारीला सुरवात केली. आईचा आणि श्रीपादचा हा पहिलाच आंतराष्ट्रिय प्रवास होता.

भाग्यश्री ट्रवेल्स ने आमची ट्रिप आयोजित केली होती आणि आमच्या बरोबर पहिले ६ दिवस सौं अनिता गोळे ह्या येणार होत्या. २९ मे ला साधाहरण ३ च्या सुमारास सन्डिस ट्रवेल्स च्या गाडिने निघालो. संध्याकाली ७ च्या सुमारास पोचलो. पण चेक इन काउन्टरला आह्माला काही कुल - बँकॉकचा बोर्डिन्ग पास मिळला नाही. मग अनेक फोनफोनी नंतर तिथे गेल्यावर मिळेल असे ठरले.

मलेशिअन ऐरलाईन्स ने रात्री १०:२० ला मुंबई सोडले आणि आम्ही समोरच्या पडद्यावर असणारे मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यात रंगून गेलो. वेलकम ड्रिन्क, जेवण, चहा, कॉफी झाल्यानंतर जरा झोप काढली आणि तो पर्यन्त विमान कुलला पोहचणार ह्याची चाहुल लागली. स्थानिक वेळेनुसार आम्ही सकाळी ५:३० ला कुल विमानतळावर उतरलो आणि पुढचा बँकॉक साठीचा बोर्डिन्ग पास घेतला.

दोन विमानांन मध्ये सुमारे ४ तास असल्यामुळे निवांत झोप काढली. कुल विमानतळावरचे वातानकुलीत यंत्र हे सुमारे ४ डिग्री C ला सेट केले असल्यामुळे ..:) जरा पंचाईत झाली.
१० वाजता दुसरे विमान होते पण, कागदपत्रे वेळेवर न मिळाल्यामुळे ३० मिनिटे उशिरा निघाले आणि सुमारे २ तासांनी बँकॉकला पोचले.